येरवड्यात एकाचा खून; एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

येरवडा - डेक्कन कॉलेज रस्त्यावरील डॉ. चिमा उद्यानासमोर तीन जणांनी कोयता व तलवारीने केलेल्या हल्ल्यात एकाचा खून झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. निहाल लोंढे (वय २५) व राहुल कांबळे (वय २३, दोघे रा. लक्ष्मीनगर) हे दोघे तारकेश्‍वर टेकडीवरून चालत घरी जात होते. त्या वेळी तीन अज्ञातांनी लोंढेवर तलवार आणि कोरत्याने वार केले. यामध्ये लोंढे जागीच मृत्यू झाला. तर कांबळे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोंढे व कांबळे यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात लोंढे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याची बुधवारी जामिनीवर सुटका झाली होती. तर अज्ञात हल्लेखोरसुद्धा गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना लवकरच जेरबंद केले जाईल, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त गणेश गावडे यांनी दिली.

Web Title: murder in Yerawada