पिंपरी : बिलाच्या वादातून तरुणाचा गळा चिरून खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

पिंपरी : बिलाच्या वादातून तरुणाचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील महापालिका इमारतीच्या पाठीमागील रस्त्यावर घडली. 

पिंपरी : बिलाच्या वादातून तरुणाचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील महापालिका इमारतीच्या पाठीमागील रस्त्यावर घडली. 

हितेश मूलचंदानी (वय 23, रा, बी ब्लॉक पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, कासवाडीतील एका हॉटेलात बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जनाणी हितेशला गाडीत बसवून पिंपरी येथे आणले. महापालिका भवनामागील रस्त्यावर हितेशच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून त्याचा खून केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder young man in piampri