वाहनचोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीकडून अडीच वर्षापुर्वी तरुणाचा खुन 

murder of a young man two and a half years ago by an accused in a vehicle theft crime
murder of a young man two and a half years ago by an accused in a vehicle theft crime

पुणे : वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीकडे तपास करतानाच अडीच वर्षांपुर्वी संबंधीत आरोपीनी एका तरुणाचा खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक करून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

निखिल अनिल लोंढे (वय 24, रा. जांभुळवाडी रोड, कात्रज) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर इमरान रौफ शेख (वय 20) आणि अहमद आयुब खान (वय 25, दोघेही रा. शिवनेरी नगर, कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्यासह वसिम अजमल खान (वय 30) व शाहरूख उर्फ खड्डया नूर हसन खान (वय 19 ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी शाहरूख खान याचा मृत्यु झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल लोंढे हा 28 ऑगस्ट 2017 या दिवशी पुणे रेल्वे स्टेशनजवळील सेंट्रल बिल्डिंग येथे बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी अहमद खान याने निखिलला त्याच्या रिक्षामध्ये बसवून कात्रजला सोडतो असे सांगितले. त्यानंतर त्याने त्याची रिक्षा कोंढव्यातील निमर्नुष्य पडीक जमीन असलेल्या पारसी मैदान नेली. तेथे चौघांनी निखिलकडील पैसे व अन्य साहित्य काढून घेतले. त्यावेळी निखिलने त्यांना विरोध केला. त्यामुळे आरोपींनी त्याच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खुन केला होता. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. तसेच या प्रकरणाचा पुढे तपास केला नव्हता. दरम्यान, कोंढव्यात सातत्याने घडणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली होती. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने यापुर्वी जबरी चोरी करताना एकाचा खुन केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला, तेव्हा अकस्मानत मृत्यु म्हणून नोंद केलेल्या निखिल लोंढे याचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील शाहरुख खान याचा मृत्यु झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com