प्रेमसंबधात अडथळा ठरत असल्याने केला खून (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पुणेः कोंढवा येथील खून हा प्रेमसंबधामध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. शिर गायब केलेला हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. उमेश भीमराव इंगळे (वय 20, रा. अण्णा भाउ साठे नगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निजाम हामशी असे आरोपीचे नाव आहे. हामशी याचे उमेशच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यास उमेश याचा अडथळा ठरत होते.

दरम्यान, अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याच्या धडापासून शिर गायब केलेला मृतदेह मंगळवारी (ता. 19) सायंकाळी आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्याबरोबरच शिर शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. या प्रकरणी विलास राऊत (वय 53, रा. अंतुलेनगर, येवलेवाडी) यांनी खबर दिली होती. राऊत हे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खडी मशिन चौकातून बालाजी हॉटेलजवळून जात असतानाच तेथील एका खड्ड्यात मृतदेह दिसला होता. त्यानंतर राऊत यांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने मृतदेह बाहेर काढला. त्या वेळी मृतदेहाचे शिर नसल्याचे आढळून आले. संबंधित मृतदेह हा पुरुषाचा असून, तो मोकळ्या जागेत टाकल्याने भटक्‍या श्‍वानांनी त्याचे लचके तोडले होते.

Web Title: Murdered in connection with love affair at pune