चोरीस विरोध केल्याने ब्लेडने वार

चोरीस विरोध केल्याने ब्लेडने वार

पुणे - भाजी विक्रेत्या तरुणाचे पाकीट चोरताना विरोध केल्याच्या कारणावरून तिघांनी तरुणावर ब्लेड व कटरने वार केले. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवार पेठेमध्ये शनिवारी पहाटे घडली. दरम्यान, पोलिसांनी तिघांना तत्काळ अटक केली.

अजिंक्‍य गंगाधर ओव्हाळ (वय २९, रा. स्वामी समर्थ बिल्डिंग, वनाज कॉर्नर, कोथरूड), आदित्य आश्‍विन डाके (वय २०, रा. संगम चौक, कोथरूड), आदित्य गणेश आदमाने (वय २१, रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) अशी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत, तर शांतु सलीम शेख (वय २५, रा. बुधवार पेठ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने फरासखाना पोलिसात फिर्याद दिली होती.

शेख यांचा  बुधवार पेठेमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता त्यांच्या एका मित्राचा नवीन पॅन्ट घेऊन जाण्यासाठी घराखाली येण्याबाबत त्यांना फोन आला. त्यानुसार त्याच्याकडून पॅन्ट घेऊन ते पुन्हा घरी जात होते, त्यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरी जिन्याने येत होते. त्यावेळी जिन्यामध्ये थांबलेल्या एकाने त्यांना अडवून त्यांचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या अन्य दोघांनी शेख यांच्यावर ब्लेड व कटरने वार केले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com