ओला कॅब चालकाचा खून करणाऱ्या आरोपींना अटक

सकाळ वृत
मंगळवार, 25 जून 2019

पुणे : ओला कॅब बुक करुन कात्रज-कोंढवा रस्ता येथे कॅबचालकाचा खून करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली. 22 जूनला कोंढवा येथे खुनाची घटना घडली होती. अंमली पदार्थ विक्रीसाठी गाडी चोरण्यासाठी हा खून केल्याचे उघड झाले आहे.

तपेशकुमार पुखराम चौधरी (वय 32, रा. जोधपुर, राजस्थान) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सुनील रघुनाथ शास्त्री (वय 52, रा.पठारे वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर, मृताचा मुलगा मनीष शास्त्री (वय 22) याने विमानतळ पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 

सीसीटीव्ही व ओला कंपनीच्या मदतीने गाडी, आरोपीचा लागला शोध घेण्यात आला. शास्त्री यांच्या मुलाने त्यांना फोन केला, त्यावेळी एका प्रवाशाला सोडण्यासाठी कोंढवा येथे आले असून लवकर घरी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर चौधरीने प्रवासी बनुन शास्त्री यांना कोंढवा येथे नेले. तेथे त्यांचा खुन करुन गाडी घेऊन गुजरातला निघून गेला. त्यावेळी कोंढवा पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधुन त्यास वापी येथे अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murderer of Ola cab driver arrested