पहिलवान ते महापौर; पुण्याच्या मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी मोहोळांनी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1985 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले आणि शहराच्या महापौरापदाची मानाची त्यांनी गदा पटकाविली. 

आपण ज्या कोथरुडमध्ये राहातो, तेथील शिस्त म्हणून मुरलीधर मोहोळ वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वर्गाला जाऊ लागले. पुढे वर्ष-दीड वर्षात ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे. मग, तेथून मोहोळांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी मोहोळांनी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1985 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले आणि शहराच्या महापौरापदाची मानाची त्यांनी गदा पटकाविली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुळशी तालुक्‍यातील मुठा गावातील किसनराव मोहोळ यांचे कुटुंब नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी साधारणपणे 1998च्या सुमाराला पुण्यातील कोथरुडमध्ये आले. ज्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासह तीन भावंडे. या तिघांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण मूळ गावी झाले. त्यातले धाकटे मुरलीधर मोहोळ. त्यांनी भावे स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

या 'दोन' शिवसेना नेत्यांपैकी होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री!

Image may contain: 2 people

मोहोळ कुटुंबाला तशी पहिलवानकीची पार्श्‍वभूमी. आजोबा, वडील, चुलते रामचंद्र मोहोळ, थोरले बंधू प्रभारकर सगळीच पहिलवान. साहजिक मुरलीधर मोहोळांनी शिक्षणासोबत कुस्तीचे धडे घेतले. पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीनंतर विशेषत: कुस्तीसाठी मोहोळ हे कोल्हापुरला गेले आणि तिथेच पदवीपर्यंतचे (कला शाखा) शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठात शिकत असतानाच मोहोळ कसबा बावड्यातील शासकीय कुस्ती केंद्राच्या आखाड्यात उतरले. याच काळात त्यांनी आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर कॉलेज संपवून मोहोळ 1996 च्या सुमारास पुण्यात परतले. तेव्हा कुस्तीचा नाद सोडून ते राजकीय आखाड्याकडे अधिक वळले.

आता भाजप सेनेला देतंय मुख्यमंत्रीपदाची ऑफर पण, राऊत म्हणाले....

माजी खासदार अनिल शिरोळे यांच्यासह काही नेत्यांच्या संपर्कात येऊन, मोहोळांनी आधी वॉर्ड पातळीवर संघटनेचे काम सुरू केले. वॉर्डापाठोपाठ त्यांच्याकडे तेव्हाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आली युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, शहर भाजपमध्ये सरचिटणीस पदांवर असताना त्यांनी कामाची छाप पाडली. याच काळात ते शहरात शिरोळे आणि राज्यात मुंडे समर्थक म्हणून ओळखले गेले. 

Image may contain: 5 people, people smiling, people standing and outdoor

लग्नाच्या बोहल्यावरून उतरून काही महिने झाले असतानाच 2002 मध्ये महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्यपद मोहोळांच्या पदरात पडले; राजकीय वर्चस्व निर्माण करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. तेव्हाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदमांचे बंधू सुबराव कदम यांच्या निधनामुळे 2006 मध्ये महापालिकेची पोटनिवडणूक (केळेवाडी प्रभाग) जाहीर झाली. ती लढण्याची संधी भाजपने मोहोळांना दिली, मोहोळांनीही कदमांविरोधात लढण्याचे आव्हान स्वीकारले. शिक्षण संस्थेमुळे कदमांची तेव्हा कोथरुडमध्ये प्रचंड ताकद असतानाही या निवडणुकीत सुबराव कदम यांच्या पत्नी सुशिला यांचा दणदणीत पराभव करीत, मोहोळ "जायंट किलर' ठरले. त्यानंतर वर्षेभरात म्हणजे, 2007 मधील महापालिकेच्या निवडणुकीत मोहोळ पुन्हा याच भागातून नगरसेवक झाले. या निवडणुकीत भाजपचे तेव्हाचे शहराध्यक्ष गिरीश बापट यांनी अनिल शिरोळेंचे तिकिट कापले, तेव्हा बापट यांचा निषेध करीत मोहोळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवार पेठेतील पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानिमित्ताने मोहोळ चर्चेतही आले.

Image may contain: 2 people

उद्धव ठाकरे काय घेणार निर्णय? महाराष्ट्राला उत्सुकता 

मोहोळांचे वाढते प्रस्थ पाहाता भाजपने त्यांना 2009 मध्ये खडकवासल्यातून विधासभा निवडणूक लढण्याचा आदेश दिला. तेव्हा, मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांच्याविरोधात कडवी झुंज देणाऱ्या मोहोळांना गटातटाचा फटका बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभागरचनेतील बदलांमुळे महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत मोहोळ यांच्या पत्नी मोनिका निवडणूक रिंगणात उतरल्या आणि त्या आयडीयल कॉलनीतून विजयी झाल्या. पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीसाठी मोहोळांनी कोथरुडमधून तयारी केली, तेव्हा पक्षाने मेधा कुलकर्णींना तिकिट दिले. मोहोळांनी लगेचच शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारीचा दावा ठोकला. तिथेही मोहोळांचा पत्ता कट झाला. तो कट करण्यामागे मोहोळांचे एकेकाळचे राजकीय गुरू अनिल शिरोळेंचा हात असल्याची चर्चा अजूनही आहे.

Image result for murlidhar mohol

महाविकासआघाडीचं ठरलंय! पाच वर्ष सेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मोहोळ चौथ्यांदा नगरसेवक झाले. महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आली आणि मोहोळांकडे पहिल्याच वर्षी महापालिकेच्या तिजोरिच्या किल्ल्या आल्या. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. हे पद सांभाळताना मोहोळांनी मुख्यमंत्ररी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची मने जिंकली. या पदावर असताना मोहोळांनी पुन्हा कोथरुडच्या उमेदवारी डोळा ठेवून तयारी चालविली. स्वपक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णींशी वेळोवेळी दोन हात करीत, मोहोळ तिकिटाच्या स्पर्धेत आघाडीवर राहिले; पण ऐनवेळी पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहोळांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा हुकले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिनाही झाला तेच मुरलीधर मोहोळांकडे पुण्याचे महापौरपद चालून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murlidhar Mohol elected as a Mayor of the Pune