मुष्ठीयुद्ध पंच शिबिराचा समारोप

रमेश मोरे
सोमवार, 9 एप्रिल 2018

पंधरा हौशी मुष्टीयुद्ध खेळाडूंना ओम साई फाऊंडेशनचे संजय मराठे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात आले.

जुनी सांगवी - पुणे शहर हौशी मुष्ठीयुद्ध असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पंच शिबिराचे सांगवी येथील मल्हार गार्डन येथे समारोप करण्यात आला. पुणे शहर हौशी मुष्ठीयुद्ध असोसिएशनच्या वतीने पाच दिवसीय पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातील सहभागी पंधरा हौशी मुष्टीयुद्ध खेळाडूंना ओम साई फाऊंडेशनचे संजय मराठे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना मदन कोठुळे म्हणाले, आजच्या टी. व्ही. मोबाईलच्या जमान्यात मुले खेळापासुन दुरावली आहेत. मैदानी खेळ व व्यायामाची मुलांमध आवड निर्माण व्हावी. म्हणुन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास हौशी खेळाडुंनी भाग घेत सहभाग नोंदवला. शिबिरात सहभागी खेळाडू प्रविण कोठुळे, विजय शिर्के, वैशाली चिपलकट्टी, उमेश पवार, शंकर जम, विजय भिकुले आदी सहभागी खेळाडुंना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सुरज साळुंके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदिप अतिक यांनी केले. तर आभार महेंद्र जव्हेरी यांनी मानले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mushtiyuddh Camp is Over in Juni Sangvi