संगीत मैफलींना लाभला 'अर्थ'

Kanebuva-Pratisthan
Kanebuva-Pratisthan

पुणे - अवघे जग घरात असताना फेसबुकवर अनेक गायक कलाकारांना रसिकांनी ऐकले. तेही विनामूल्य; पण आता या मैफलीतून अर्थार्जनाचा प्रयोगही सुरू आला आहे. गायन मैफलींना 'अर्थ' मिळवून देत सांगलीतील काणेबुवा प्रतिष्ठान आणि स्मृतीगंध या फेसबुक पेजने नवी सुरवात केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावले, असले तरी त्यातून अनेकजण संधी शोधतात. याच स्थितीचा फायदा घेत रसिकांना गाणी ऐकण्याचा आनंद बसल्या आनंद देण्यासाठी स्मृतीगंधने भावसरगम मैफलीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या मैफलीतील सहभागी गायक-वादक हे अमेरिकेतून ऑनलाइन सादरीकरण करणार आहेत. त्यासाठी एका संकेतस्थळावर रसिकांना सशुल्क नोंदणी करावी लागेल. हे शुल्क अल्प असून, त्यात घरातील सर्वांना ही मैफल ऐकता-पाहता येणार आहे.

काणेबुवा प्रतिष्ठान आषाढी वारीच्या निमित्ताने गायक डॉ. संजीव अभ्यंकर आणि गायिका मंजुषा पाटील या अभंगरंग कार्यक्रम करीत आहे. पाटील म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे नवेनवे पायंडे पडत आहेत. संगीत क्षेत्रालाही हे बदल स्वीकारावे लागतील. ऑनलाइन मैफली ही नवी पद्धत होऊ पाहात आहे, हा सकारात्मक बदल आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दर महिन्याला नवनवे कलाकारांबरोबर घेत अशा मैफली करणार आहोत."

स्मृतीगंध फेसबुक पेजचे संयोजक रोहित शुक्ल यांनी सकाळशी बोलताना सांगितले, की मराठी गीतांच्या ऑनलाइन सशुल्क मैफलीचा प्रयोग आम्ही करीत आहोत. यात यश मिळाले, तर अनेक गायक-वादक कलाकारांना आर्थिक उत्पन्नाचा वेगळा मार्ग मिळू शकेल. बऱ्याचदा सभागृहातील मैफिलींच्या प्रवेशिका महाग असतात. ऑनलाइन मैफलीमुळे अगदी अल्प किंमतीत कुटुंबीयातील सर्वांना मैफलीचा आस्वाद घेता येऊ शकेल."

"आम्ही आयोजित केलेल्या भावगीत मैफलीस चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत शंभर रसिकांनी नोंदणी केली आहे. पण येत्या दोन दिवसांत प्रतिसाद वाढेल. हा एक वेगळा प्रयोग आहे. त्यामुळे सुरवातीचा प्रतिसाद पाहून पुढील आयोजनात काही बदल करता येतील. पण ज्यांना सादरीकरणाला सहजी मंच मिळत नाही, त्यांच्यासाठी अर्थाजर्नाचा नवा मार्ग या निमित्ताने खुला होईल," असे शुक्ल म्हणाले.

ऑनलाइन मैफल ही संकेतस्थळावर लाइव्ह स्वरुपात होईल. रसिकांनी त्यासाठी नोंदणी केल्यानंतर त्यांना संकेतस्थळाची लिंक पाठविली जाणार आहे, हेच कार्यक्रमाचे तिकिट असेल, असे त्यांनी नमूद केले.

ऑनलाइन मैफली हे गायक-वादक कलाकारांसाठी कायमस्वरुपी अतिरिक्त व्यासपीठ ठरू शकते. कोरोना काळात अनेक प्रयोग होताहेत. त्याची ही देणे, असे सकारत्मकपणे म्हणता येईल.
- डॉ. संजीव अभ्यंकर (शास्रीय गायक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com