कांदलगावच्या भजनी मंडळास साहित्य वितरण

राजकुमार थोरात 
रविवार, 24 जून 2018

वालचंदनगर : कांदलगाव (ता.इंदापूर) येथे भजनी मंडळास पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले. 

कांदलगाव मध्ये अनेक धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात. येथील भजनी मंडळाने धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी तांबिले यांच्याकडे साहित्यांची मागणी केली होती. तांबिले यांनी भजनी मंडळास जिल्हा परिषदेच्या वतीने साहित्य उपलब्ध करुन दिले असून यामध्ये पकवाज, वीणा, टाळ, मृदुंग यांचा समावेश आहे. यावेळी तांबिले यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही संताची भूमी असून भजने पुरातन काळापासून सुरु आहेत.

भजन, किर्तनामुळे मन प्रसन्न राहण्यास मोलाची मदत होत असल्याचे सांगितले. यावेळी भजनी मंडळाचे सदस्य कुंडलिक सरडे, विठ्ठल राखुडे, मधुकर भोसले, भास्कर बोबडे, प्रभाकर कोळी यांनी जिल्हा परिषदेने दिलेल्या साहित्याचा स्विकार केला. यावेळी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, नागेश पाटील, गणेश पाटील, विजय सोनवणे, अमोल देवकर, संदीप तुपे, समाधान राखुंडे, काशिनाथ ननवरे, रतीलाल बाबर, पप्पू सोनवणे, पांडुरंग इंगळे, दस्तगिर नायकुडे उपस्थित होते.

Web Title: musical equipment distribution to Bhajani Mandal of Kandal gaon