Elon Musk: शेफाली वैद्य यांच्या ट्विटची थेट मस्कने घेतली दखल! म्हणाले, लवकरच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shefali Vaidya

Elon Musk: शेफाली वैद्य यांच्या ट्विटची थेट मस्कने घेतली दखल! म्हणाले, लवकरच...

लेखिका, उद्योजिका, प्रवक्त्या शेफाली वैद्य कायमच वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत असतात. त्या आपली मते परखडपणे सोशल मिडियावर खासकरून ट्विटरवरून मांडत असतात. तेच ट्वीटर वैद्य बंद करण्याच्या तयारीत दिसून आल्या आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. तर इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत.

बदललेल्या अनेक घटकांमुळे ट्वीटरमध्ये अनेक बदल झाले आहेत यामुळे काहीचे फॉलेअर्स कमी होत आहेत. लाईक्स कमी होत आहेत. याचा फटका शेफाली वैद्य यांनाही बसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी यासंबधीचे एक ट्विट करत ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांना टॅग करून याबद्दलची तक्रार सांगत ट्विटर सोडण्याची वेळ आली आहे अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

हेही वाचा: Elon Musk : माझ्यावर टीका करा पण...; पत्रकारांची अकाऊंट बंद करत मस्कने दाखवले रंग

ट्विटमद्धे शेफाली वैद्य म्हणतात की, 'ट्विटर सोडण्याची वेळ आली आहे. जारी माझं अकाऊंट व्हेरिफाईड असलं तरी माझे ट्विटस लोकांपर्यंत पोहचत नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे घडत आहे. दिवसेंदिवस माझ्या फॉलोवर्समध्ये घट होत आहे. नवीन फॉलोअर्स वाढत नाहीत माझ्या फॉलोअर्सची संख्या दररोज कमी होत आहे.' तर या ट्विटच्या शेवटी त्यांनी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांना टॅग केले आहे. वैद्य यांच्या ट्विटला उत्तर देत मस्क म्हणतात की, आम्ही याचा पाठपुरावा करू.

हेही वाचा: Elon Musk : ट्वीटरच्या चिमणीकडून भारतीय koo चा आवाज बंद

टॅग्स :TwitterElon Musk