मस्केटिअर अॅप : कोठेही, कधीही क्षणांत मिळवा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

हे करा...
मस्केटिअर ऍप डाउनलोड करण्यासाठी मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जा, मस्केटिअर (musketeer) टाइप करून डाउनलोड करा.


संकेतस्थळ - www.getmusketeer.com

पुणे : शाळा-महाविद्यालयात विद्यार्थिनींची कोणी छेड काढत असेल... तरुणीवर हल्ला झाला... कोणाला हृदयविकाराचा झटका आला; वैद्यकीय मदतीची गरज असेल... अचानक एखादे संकट ओढवले तर 'मस्केटिअर' ऍपवरील बटन दाबा अन्‌ काही क्षणांतच आई-वडील, नातेवाईक, मित्र आणि तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरील विश्‍वासू व्यक्‍ती किंवा पोलिस तुमच्या मदतीला धावून येतील. त्यासाठी मोबाईलमध्ये मस्केटियर ऍप डाउनलोड करून घेणे आवश्‍यक आहे.

'कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी' मस्केटिअर ऍप्लिकेशन हे 'रिअल टाइम हेल्प ऍप' आहे. यासाठी मोबाईलमध्ये 'जीपीएस' सुविधा सुरू असणे अनिवार्य आहे. मस्केटिअर ऍपमुळे तुम्ही नेमके कोठे आहात, याचे लोकेशन तुमच्यापासून काही अंतरावरील व्यक्‍तीला कळेल आणि ती व्यक्‍ती तुमच्या मदतीला धावून येईल.
हे ऍप वापरणाऱ्या तुमच्या जवळच्या आणि अनोळखी व्यक्‍तीलाही तुम्ही संकटात आहात, हे कळेल.

अनोळखी व्यक्‍तीवर विश्‍वास नसेल तर तुम्ही संकटात कोणाला बोलावून घ्यायचे हे तुम्ही ऍपमध्ये नमूद करू शकता. तुमचे आई-वडील, नातेवाईक बाहेरगावी राहत असतील तरीही त्यांना ऍपवरून मेसेज मिळेल. शिवाय, ऍपचे बटन दाबल्यास घटनास्थळावरील संवादाचे व्हाइस रेकॉर्ड होते. पोलिसांची मदत हवी असल्यास ऍपमध्ये 100 या क्रमांकासह इतर आपत्कालीन क्रमांकांचीही सुविधा आहे.

तुमचे नेटवर्क तयार करा
'मस्केटिअर' वापरण्याची पद्धत इतर कोणत्याही ऍपपेक्षा सोपी आणि खात्रीची आहे. त्याला तुमचा 'सुरक्षा मित्र' बनवायचे असेल तर ऍप डाउनलोड करा. त्यातील सूचनांप्रमाणे तुमची नोंदणी करा. शिवाय तुमचे जवळचे नातेवाईक, विश्‍वासू मित्र आदींनाही ते डाउनलोड करायला सांगा, म्हणजे तुमचे एक नेटवर्क तयार होईल, तुम्ही संकटात असाल किंवा कोणत्याही स्वरूपाची मदत हवी असेल, तर ऍपवरील लाल बटन दाबताच या नेटवर्कपर्यंत तुमचा संदेश पोचेल.

Web Title: musketeer app for instant help anywhere anytime