बारामतीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद केली उत्साहात साजरी

मिलिंद संगई
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

बारामती  : शहर व परिसरात आज मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. येथील ईदगाह मैदानावर आज मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. उबेदुल्लाह काझी यांनी आज सकाळी नमाजपठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांना संदेश दिला. बकरी ईदचे विश्लेषण त्यांनी केले.

अल्लाहचे प्रेषित इजरत इब्राहिम व त्यांची पत्नी हाजरा यांची अल्लाहच्या प्रती भक्ती, बलिदान, त्याग व विश्वास यांची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. इस्लामी कालगणनेनुसार जिल्हज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणा-या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात. 

दरम्यान आज शहरातील जामे मशीद, चाँदशाहवली दर्गा, कसबा भागातील मक्का मशीद, छगनशाह दर्गा मशीद येथेही आज सामूहिक नमाजपठण केले गेले. विविध समाजबांधवांनी आज मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Muslim brothers celebrate goat idiom in Baramati