चंद्रदर्शन झाल्याने मुस्लीम बांधवांच्या रमजान महिन्याला प्रारंभ

युनूस तांबोळी
गुरुवार, 17 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आज (गुरूवार) सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने मुस्लीम बांधवांच्या रमजान महिन्याला प्रारंभ झाल्याने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शुक्रवार (ता. 18) पासून पहिला उपवास होणार असल्याचे जाहिर करण्यात आले.

मुस्लीम बांधवांचा पवित्र सण म्हणून रमजान या सणाला महत्व आहे. रोजा (उपवास), नमाज, तरावीहची नमाज आणी दान धर्म करण्याकडे मुस्लीम बांधवांचा विशेष कल असतो. आज सायंकाळी सात वाजून 10 मिनीटांनी चंद्रदर्शन झाले. पहिली तराविह ची नमाज साठी मुस्लीम बांधवांनी मसजीद मध्ये गर्दी केली होती. चंद्रदर्शन झाल्याने या भागातील मुस्लीम बांधवानी शुक्रवार (ता. 18) ला पहिला उपवास सुरूवात होणार आहे.

रमजान महिन्याला प्रांरभ झाल्याने गावागावात हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नमाज, कुराणची तिलावत या पाठोपाठ गरजूंना मदत, दान, चुकीच्या गोष्टीची माफी मागावी, समाजात शांतता निर्माण होईल असे वर्तन आचरावे व या सणाचे पावित्र राखावे असे आवाहन कवठे जामा सुन्नी मसजीद चे मौलाना अब्दुल रज्जाक यांनी केले.

Web Title: The Muslim brothers started the month of Ramadan

टॅग्स