अजित पवारांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

दांडेकर पूल परिसरातील जलमय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते; परंतु त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती. अजित पवार यांनी एका रद्दीच्या दुकानात, तसेच संजय लांडगे यांच्या घरात माहिती घेतली. आम्हाला धान्य, वस्तू, कपडे यांची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. पवार यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. त्यानंतर परत जाण्यासाठी ते गाडीत बसले असता, त्यांची गाडी युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी अडविली. ‘आमच्या परिसरात चिखल झाला आहे. कचरा तातडीने उचलावा.

दांडेकर पूल परिसरातील जलमय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते; परंतु त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती. अजित पवार यांनी एका रद्दीच्या दुकानात, तसेच संजय लांडगे यांच्या घरात माहिती घेतली. आम्हाला धान्य, वस्तू, कपडे यांची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. पवार यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. त्यानंतर परत जाण्यासाठी ते गाडीत बसले असता, त्यांची गाडी युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी अडविली. ‘आमच्या परिसरात चिखल झाला आहे. कचरा तातडीने उचलावा. आमच्या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून काळजी घ्यावी, आम्हाला तातडीने मदत मिळाली पाहिजे’ आदी मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, शिवाजी गदादे, प्रिया गदादे हे माझ्यावतीने पाहणी करतील, असे पवार यांनी सांगितले. 

अजित पवार म्हणाले, ‘‘लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक ती कामे केलीच पाहिजेत, त्यासाठी सत्ताधाऱ्यांची प्रशासनावर पकड हवी. मात्र, सत्ताधाऱ्यांना ते जमत नाही.’’ 

त्यांचा बेजबाबदारपणा दिसून आला असून, सत्ताधाऱ्यांचे अधिकारी ऐकत नसल्याचे सांगत पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutha Canal Wall Breaches Ajit Pawar Watching