ओढ्यांना आला पुर अन् मुठा झाली प्रवाहित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

कोंढवे धावडे: धरणातून पाणी सोडलेले नसताना देखील धरणाच्या खालील ओढ्याना आलेल्या पूरामुळे मुठा नदी प्रवाहित झाली आहे. मुठा नदीत दत्तवाडीत दोन हजार 635 क्यूसेक वाहत आहे तर बंडगार्डनच्या पुलावर 56 हजार 645 क्यूसेक वाहत आहे. 

कोंढवे धावडे: धरणातून पाणी सोडलेले नसताना देखील धरणाच्या खालील ओढ्याना आलेल्या पूरामुळे मुठा नदी प्रवाहित झाली आहे. मुठा नदीत दत्तवाडीत दोन हजार 635 क्यूसेक वाहत आहे तर बडदगार्डनच्या पुलावर 56 हजार 645 क्यूसेक वाहत आहे. 

कोंढवे धावडे येथील कुंजाईच्या ओढ्याला आलेला पूर. हा ओढा आहिरेगाव एनडीएतून कोंढवे धावडे गावामध्ये येतो आणि गावातून तो मुठा नदीला मिळतो. खडकवासला धरणानंतर मुठा नदीत मिळणारा हा दुसरा ओढा आहे. अशाप्रकारे खडकवासला, नांदोशी, किरकटवाडी, शिवणे, वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढ्याना पूर आला आहे. 

ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला असल्याने ते नदीला मिळत आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत धरणातून पाणी सोडलेले नाही. अशा प्रकारच्या ओढयामुळे मुठा नदीचा प्रवाह सुरू झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutha river overflow Without dam water