गणेशोत्सव पुरवणी वाचा अन्‌ भरघोस बक्षिसे जिंका

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

खऱ्या अर्थाने लहान-थोरांचा मित्र असलेल्या श्रीगणेशाची माहिती पुढच्या पिढीला व्हावी, यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ ‘my friend श्रीगणेशा’ ही अर्धदैनिक आकारातील पुरवणी सोमवारी (ता. २ सप्टेंबर) प्रसिद्ध करत आहे. त्यामधील प्रश्‍नमंजूषा सोडवून भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी सर्व गणेश भक्तांना व वाचकांना मिळणार आहे.

पिंपरी - खऱ्या अर्थाने लहान-थोरांचा मित्र असलेल्या श्रीगणेशाची माहिती पुढच्या पिढीला व्हावी, यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ ‘my friend श्रीगणेशा’ ही अर्धदैनिक आकारातील पुरवणी सोमवारी (ता. २ सप्टेंबर) प्रसिद्ध करत आहे. त्यामधील प्रश्‍नमंजूषा सोडवून भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी सर्व गणेश भक्तांना व वाचकांना मिळणार आहे. 

गणेशोत्सवानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या ‘my friend श्रीगणेशा’ या पुरवणीत गणपती विषयीची माहिती दिली आहे. त्यासंबंधीच्या आख्यायिका वाचायला मिळतील. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात कोणी, कधी, कुठे व का केली? याची माहिती मिळेल. सोबतच चालू घडामोडींवर आधारित ३७० कलम, ट्रिपल तलाक विधेयक, स्वच्छ भारत अभियान, प्लॅस्टिक मुक्ती अभियान, समाज प्रबोधनाचे माध्यम अशी माहिती मिळणार आहे. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगातील गणपतीच्या अवतारांची माहिती आहे. कलियुगात होणाऱ्या अवतराची माहिती आहे. गणपतीच्या विविध नावांशी संबंधित माहिती या संग्राह्य पुरवणीत देण्याचा प्रयत्न आहे. कुटुंबातील लहान-थोरांनी एकत्र येऊन माहिती व सामान्य ज्ञानाचा वारसा एकमेकांना देत प्रश्‍नपत्रिका सोडवावी, असा हेतू स्पर्धेमागे आहे. ‘सकाळ’च्या सोमवार (ता. २ सप्टेंबर) ‘पिंपरी-चिंचवड टुडे’मध्ये उत्तरपत्रिका प्रसिद्ध करणार आहोत.

त्यावर आपण प्रश्‍नपत्रिकेतील उत्तरे नोंदवायची आहेत. तसेच, सुवाच्च अक्षरात आपले नाव व इतर सर्व माहिती लिहून उत्तरपत्रिका आपापल्या भागातील दिलेल्या ठिकाणी शनिवारपर्यंत (ता. ७ सप्टेंबर) पोचवायच्या आहेत. या स्पर्धेचा निकाल ‘ड्रॉ’ पद्धतीने काढण्यात येईल. प्रश्‍नमंजूषेतील ६० पैकी ५० प्रश्‍नांची अचूक उत्तरे देणाऱ्या बाप्पांच्या मित्रांना बक्षीस जिंकायची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा निकाल ९ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केला जाईल. १० सप्टेंबरला बक्षीस वितरण होईल. तर मग, सज्ज व्हा! 
पुरवणी वाचून प्रश्‍नमंजूषा सोडवा आणि जिंका बक्षिसे. 
अधिक माहितीसाठी संपर्क - ९५४५९५४७३३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Friend Ganesha Suppliment Read Gift