...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

केडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट कामे केल्याचे सिद्ध झाले, तर थोरात मला पाठिंबा देणार का, याचे उत्तर थोरात यांनी द्यावे. आमच्या दोघांच्या काळातील आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा अहवाल दहा दिवसांत प्रसिद्ध करावा, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना कुल म्हणाले, ‘‘ऑक्‍टोबर २००९ ते ऑक्‍टोबर २०१४ या काळात थोरात यांनी आमदार म्हणून राज्य सरकारकडे पाठविलेले प्रस्ताव, मान्यता व उपलब्ध झालेला निधी हा ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही. थोरात यांनी दहा दिवसांत अहवाल किंवा विकासकामांची यादी प्रसिद्ध केली नाही, तर त्यांच्या विकासकामांचा अहवाल मी प्रसिद्ध करणार आहे. ३०० कोटींची माझी माहिती चुकीची असेल, तर थोरात यांनी अहवाल प्रसिद्ध करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. थोरात म्हणतात, मला जनतेचा वारसा आहे. या वाक्‍याचा अर्थ मला समजत नाही. अनेक जण माझे राजकीय विरोधक आहेत; मात्र मला धमकीचा संदेश आल्यानंतर फक्त थोरात अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारणाची सवय जात नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यात थोरात यांनी लुडबूड करू नये. कोणाचा नातेवाईक कधी आरोपी होईल, हे पदाधिकाऱ्यांच्या हातात नसते आणि थोरात यांच्या नातेवाइकांवर आरोप झाले नाहीत का, किंवा होणार नाहीत का? थोरात यांनी सभागृहात किती प्रश्न मांडले आणि मी किती मांडले याचीही अधिकृत माहिती मी देणार आहे. वाघोली- राहू- पारगाव या केंद्रीय मार्गाच्या श्रेयाबद्दल खासदार सुप्रिया सुळे काही बोलत नाहीत, थोरात बोलणारे कोण? त्यांनी सुळे यांचे वकीलपत्र घेऊन बोलावे. केंद्रीय मार्ग निधीला बजेट हेड राज्य सरकारच्या आहे. सरकारने केलेल्या या रस्त्याच्या संपूर्ण पत्रव्यवहारावर माझे नाव आहे. 

अण्णा-अप्पांवर बोलण्याची इच्छा नाही 
रमेश थोरात यांनी अण्णा- अप्पांच्या (सुभाषअण्णा कुल व रमेशअप्पा थोरात) जोडीबद्दल नुकतेच गौरवोद्‌गार काढले होते. यावर कुल म्हणाले, ‘‘या जोडीतील थोरात यांच्या वर्तनाबद्दल सुभाषअण्णांनी मला जे काही सांगितले आहे, ते मी बोललो तर थोरात यांच्या आजूबाजूला कोणी राहणार नाही. पण, दिवंगत झालेल्या व्यक्तीचा दाखला देत मला सहानुभूती मिळवायची नाही. यावर बोलण्यासाठी थोरात यांनी मला भाग पाडू नये.’’  

Web Title: my support for Ramesh Thorat says Rahul Kul