नगर परिषदांमध्ये 2 हजार जागांची भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

भवानीनगर - राज्यातील विविध नगर परिषदांमध्ये अभियंता, लेखापाल व करनिर्धारण अधिकारी पदाच्या तब्बल १ हजार ८८९ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता येत्या २७ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

भवानीनगर - राज्यातील विविध नगर परिषदांमध्ये अभियंता, लेखापाल व करनिर्धारण अधिकारी पदाच्या तब्बल १ हजार ८८९ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता येत्या २७ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

राज्य सरकारच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या महाराष्ट्र नगर परिषद सेवेतील अ, ब व क श्रेणीची ही भरती होणार आहे. यामध्ये स्थापत्य अभियंता (क गट) पदाच्या अ, ब व क श्रेणीसाठी ३६७ जागा, विद्युत अभियंता पदासाठी ६३, संगणक अभियंता पदाच्या ८१ व पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता पदाच्या ८४ जागांचा समावेश आहे. याखेरीज महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा सेवाअंतर्गत लेखापाल व लेखापरीक्षकांच्या तब्बल ५२८ जागांची भरती होणार आहे. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाच्या ७६६ जागा भरल्या जाणार आहेत. यातील २५ टक्के पदे ही नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून भरली जाणार आहेत. याची संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा साधारणतः १८ मे रोजी होणार आहे. 

यातील समांतर आरक्षण, अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा व शैक्षणिक माहितीसाठी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. 

Web Title: nagar parishad 2000 seat recruitment