नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी बदल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

वाघोली - पेरणे फाटा (ता. हवेली) येथील विजयरणस्तंभ अभिवादनासाठी येणारी गर्दी लक्षात घेता १ जानेवारी रोजी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

१ जानेवारीला रात्री १२ वाजून १० मिनिटांपासून पुढे २४ तास हा बदल राहणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुलामार्गे सोलापूर महामार्गाने वळवण्यात येतील, तर पुण्याकडून नगरकडे जाणारी जड वाहने चाकणमार्गे किंवा खराडी बायपास येथून हडपसर-सोलापूर मार्गाने केडगाव चौफुला येथून नगरकडे वळवण्यात येणार आहेत. अभिवादनासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येतात. विजयरणस्तंभ हा पुणे-नगर महामार्गालगत असल्याने वाहतुकीमुळे कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

Web Title: Nagar Road Transport Management Changes