तळेगावात कर वसुलीचे अाव्हान
तळेगाव दाभाडे - करवसुलीसाठी राहिलेला अल्प कालावधी, कर निरीक्षकांची झालेली बदली, करआकारणीसंदर्भात सत्ताधारी व विरोधकांत सुरू असलेली राजकीय रस्सीखेच बघता कर वसुलीचे आव्हान निर्माण झाले आहे.
नगर परिषदेच्या वतीने नुकतीच चतुर्थ करआकारणी करण्यात आली. त्यानुसार वाढलेल्या कराच्या बोजामुळे नागरिक संतप्त होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये चढाओढ सुरू होती.

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार ६ कोटी ८७ लाख रुपयांची कपात वगळता सुमारे १७ कोटी रुपये कराची वसुली करावयाची आहे. या वसुलीसाठी नव्याने बिले तयार करण्यापासून सुरवात करावी लागणार आहे. यासाठी कालावधी लागणार आहे. अशातच भाडेकरू नसतानाही भाडेकरू गृहीत धरून आकारणी केलेल्या कराच्या बिलांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. आता परिषदेकडे अवघा अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशातच कर निरीक्षक विजय भालेराव यांची लोणावळा नगर परिषदेमध्ये बदली झाली असून, त्यांच्या जागी विजय शहाने हे नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. बिले तयार करून वाटप करणे, दुरुस्ती करणे व त्यानंतर वसुली करण्याचे नियोजन ही सर्व अडथळ्यांची शर्यत पार करताना प्रशासनाची पुरती दमछाक होणार आहे, हे निश्चित.
घट होण्याची शक्यता
मुख्याधिकारी वैभव आवारे हे सध्या शहर स्वच्छता अभियानात गुंतले आहेत. त्यामुळे वसुलीच्या मर्यादेत अधिकची भर पडली आहे. त्यामुळे आगामी अल्प काळ पाहता कर वसुलीमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रशासन काय करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.