बाजारात संत्र्यांचा दरवळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - आकराने मोठी, रंगाने नारंगी आणि चवीला गोड असलेल्या नागपुरी संत्र्यांची आवक वाढू लागली आहे. शहर उपनगरांसह गोवा, हुबळी व निपाणी भागातूनही या संत्र्याला सध्या मागणी वाढली आहे. प्रतवारीनुसार आठ ते नऊ डझनाच्या एका पेटीला ७०० ते ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात ऑक्‍टोबर महिन्यापासून संत्र्याची आवक सुरू झाली. सुरवातीला दररोज दोन-तीन ट्रक इतकी संत्र्यांची होती; तसेच हंगामाच्या सुरवातीला या संत्र्यांची चवदेखील आंबट-गोड होती. आता हंगाम बहरला असून बाजारात दाखल होत होत असलेल्या संत्री चवीला गोड असून त्याचा आकार व दर्जाही चांगला आहे. त्यांना ग्राहकांसह घरगुती ग्राहकांसह ज्यूस व्यावसायिकांकडून चांगली मागणी आहे. नागपूर संत्रीच्या आठ, दहा, अकरा ते बारा डझनाच्या पेटींना दर्जानुसार ७०० ते ९०० रुपये भाव मिळत आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या संत्र्यांचा हंगाम सुरू राहील, असेही व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.

मार्केट यार्डात नागपूर भागातून दररोज सुमारे १५ ते १६ ट्रक इतकी संत्र्याची आवक होत आहे. परतवाडा, वरूड, चिखली, अंजनगाव, अचलपूर, अमरावती आदी भागातूनही आवक होत आहे. शहरासह परराज्यांतून देखील या संत्र्याला सध्या मागणी वाढली असून, त्यांना भावही चांगला मिळत आहे. 
- करण जाधव, व्यापारी 

Web Title: Nagpur orange in marketyard in pune