माफीच्या साक्षीदारासाठी राजेश चौधरीला आमिष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - सरकार पक्षाकडे आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याने राजेश चौधरी याला आमिष दाखवून माफीचा साक्षीदार केले आहे, असा दावा नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात आरोपीच्या वकिलांनी केला. 

पुणे - सरकार पक्षाकडे आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याने राजेश चौधरी याला आमिष दाखवून माफीचा साक्षीदार केले आहे, असा दावा नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात आरोपीच्या वकिलांनी केला. 

विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्यासमोर या खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली असून, आरोपींतर्फे ऍड. बी. ए. अलूर, ऍड. रणजित ढोमसे पाटील, ऍड. अंकुश जाधव हे बाजू मांडत आहेत. चौधरी याच्या साक्षीनुसार त्याला घटनेच्या दोन दिवसांनी पश्‍चात्ताप झाला होता; परंतु त्याने दोन वर्षांनंतर न्यायालयाकडे जबाब का नोंदविला, असा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला. त्याने पोलिसांच्या दबावामुळे आपण माफीचा साक्षीदार झाल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता, त्यानंतर त्याने पुन्हा स्वमर्जीने माफीचा साक्षीदार झाल्याचे न्यायालयात सांगितले आहे. त्याच्या बोलण्यात विसंगती असून, पोलिसांच्या दबावामुळे माफीचा साक्षीदार झाल्याचे नमूद केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाने खुलासा केलेला नाही. केवळ बलात्काराच्या गुन्ह्याच्या वेळी होतो, खुनाच्या वेळी नव्हतो, असा त्याचा जबाब असून, गुन्ह्याच्यावेळी पूर्ण वेळ हजर नसलेली व्यक्ती माफीचा साक्षीदार कसा होऊ शकते, असा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला. 

Web Title: naina pujari murder case