बाळासाहेबांचे नाव उड्डाण पुलाला द्या

MNS
MNS

पुणे - नळस्टॉप चौकातील नियोजित ‘डबल डेकर’ उड्डाण पुलास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेकडे केली आहे. कोथरूडच्या विकासात ठाकरे यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. त्यामुळे ठाकरे यांचेच नाव या पुलाला द्यावे, असे मनसेने म्हटले आहे. 

हवे तर चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, असेही त्यांनी सुचविले आहे. 

महानगरपालिकेच्या वतीने कर्वे रस्त्यावर नळस्टॉप चौकादरम्यान एसएनडीटी महाविद्यालय ते गरवारे महाविद्यालयापर्यंत दुमजली उड्डाण पुलाचे काम महामेट्रोकडून सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे नुकतेच भूमिपूजन केले. 

कोथरूडच्या विकासात बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे, त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस हेमंत संभूस आणि किशोर शिंदे यांनी केली आहे. तर, भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ, दीपक पोटे, जयंत भावे, अनुराधा सहस्रबुद्धे, मंजूश्री खर्डेकर यांनी या पुलास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com