रमजान मधून मिळते ऐक्याची भावना: नलिनी खर्डे

युनूस तांबोळी
सोमवार, 18 जून 2018

टाकळी हाजी (पुणे): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस नलिनी खर्डे यांनी रमजानचे उपवास पुर्ण केले आहेत. गेली पाच वर्षे त्या रमजानचे उपवास करत असून, समाजीक ऐक्याची भावना व मुस्लीम महिलांना जाणून घेत असल्याने त्या हिंदू मुस्लीम ऐक्याचे अनोखे उदाहरण ठरले आहेत.

टाकळी हाजी (पुणे): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस नलिनी खर्डे यांनी रमजानचे उपवास पुर्ण केले आहेत. गेली पाच वर्षे त्या रमजानचे उपवास करत असून, समाजीक ऐक्याची भावना व मुस्लीम महिलांना जाणून घेत असल्याने त्या हिंदू मुस्लीम ऐक्याचे अनोखे उदाहरण ठरले आहेत.

खर्डे यांनी कान्हूर मेसाई गावचे माजी सरपंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी या परीसरात विकासाची मोठी कामे केली आहेत. शेती काम व गृहिणी म्हणून त्यांचे काम महत्वाचे आहे. बिसमिल्ला तांबोळी, लैला मुलाणी, आसीया तांबोळी यासारख्या मुस्लीम महिलांची मैत्री असल्याने त्यांना रमजानचे महत्व माहित झाले. मुस्लीम महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार नेहमीच महत्वाचा ठरला. दैनिक 'सकाळ'च्या तनिष्का व्यासपिठाच्या माध्यमातून त्यांनी मुस्लीम महिलांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. गेली पाच वर्षापासून ते रमजान महिण्याचे उपवास करतात. अकरा महिने हिंदू रितीरीवाजाप्रमाणे उपवास करत असतात. त्यावेळी मुस्लीम महिलादेखील त्यांच्यात सामील होताना दिसतात. यावर्षी देखील त्यांनी रमजानचे उपवास पुर्ण केले. सामाजीक ऐक्याची भावना व शांतता नांदण्यासाठी त्यांचा हा उपक्रम कौतूकास्पद आहे. अल्पसंख्याक महिलांचे मुस्लीम समाजातील प्रश्न सोडविताना त्यांचा पुढाकार इतरांसाठी आदर्श ठरणारा आहे. या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी त्यांची भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

महिलांचे प्रश्न सोडविणे हे तर मी माझे कर्तव्य समजते. पण रमजान महिण्याचे पावीत्र महत्वाचा विषय आहे. त्यातून मानसीक समाधान, आरोग्यमय वातावरण व सामाजीक ऐक्याची भावना निर्माण होते. त्यामुळेच गेली पाच वर्षे मी हे उपवास करत असून पुढील काळात देखील अवीरत रमजान चे उपवास सुरू ठेवणार असल्याची भावना शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस नलिनी खर्डे यांनी व्यक्त केली.

Web Title: nalini kharde fasting ramadan before five years