जिल्ह्यात ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नीरा नरसिंहपूर - बकरी ईदनिमित्त जिल्ह्यातील विविध गावांत सामूहिक नमाज पठण व प्रार्थना करण्यात आली. या वेळी केरळमध्ये आलेल्या पुराच्या संकटातून नागरिकांसाठी, तसेच पाऊस पडून पीकपाणी जोमात येण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. 

नीरा नरसिंहपूर परिसरात पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांनी ईदगाह मैदानात नमाज पठण व प्रार्थना केली. तर दादाभाई शेख, ताजुद्दीन शेख, बाळू शेख, अमीन शेख, शाबुद्दीन शेख, नबीलाल शेख आदींनी प्रार्थनेचे विशेष आयोजन केले होते. बावडा येथील ईदगाह मैदानात मौलाना मुख्तार शेख यांनी नमाज पठण केले. ग्रामपंचायत सदस्य मुनीर आत्तार, अस्लम मुलाणी, मौलाना रशिद आत्तार, चाँद सय्यद, अफसर मुलाणी, अमीर सय्यद, समीर मुलाणी  यांनी नमाज व प्रार्थनेचे नियोजन केले. केरळ पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन अमीर सय्यद यांनी या वेळी केले.

लुमेवाडी येथील ईदगाह मैदानावर अलहाज मौलाना झाकिर शेख यांनी उपस्थित समाज बांधवांना नमाज पठण केले. तसेच अलहाज मौलाना अब्दुल गणी शेख यांनी बकरी ईदचे महत्त्व सांगून प्रार्थना केली. हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांच्या दर्गामध्ये मजारवर फुलांची चादर घालून प्रार्थना व सलाम करण्यात आला.

Web Title: Namaj Pathana in the district on the occasion of Bakrid