बकरी ईद निमित्त पुण्यात 'फेसबुक लाईव्ह'द्वारे नमाज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मुस्लीम बांधवांचा घरातून सहभाग

- आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद, शराफत अली यांनी या उपक्रमादरम्यान नमाज पठण केले. 

-  आझम कॅम्पसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत बकरी ईद नमाजचे 'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शहरातील मुस्लीम बांधवांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत घरातूनच सहभाग घेतला. आझम कॅम्पस शैक्षणिक, सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. 

धक्कादायक : पुण्याचं हवामान होतंय‘एक्स्ट्रीम’; ऊन, पाऊस, थंडी सगळंच होतंय अती​

आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद, शराफत अली यांनी या उपक्रमादरम्यान नमाज पठण केले. तर आझम कॅम्पसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. 

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून 29 मे पासून दर शुक्रवारी फेसबूक लाईव्ह द्वारे नमाज पठण केले जात आहे. यामुळे मशिदीत गर्दी होत नसून नागरिकांना घरातूनच सहभागी होणे शक्य झाले व प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळता आले.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Namaz via Facebook Live on the occasion of Eid al Adha 2020 from pune