गावातील एका ध्येयवेड्या तरूणाने कमाविले जलतरणपट्टू म्हणून नाव

Prabhat-Koli
Prabhat-Koli

घोडेगाव - कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. याची सर्वाधिक झळ जलतरणपटूंना बसली आहे. अजूनही शारिरीक व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र चिकाटी सोडायची नाही या उद्देशाने 21 वर्षीय जलतरणपट्टू प्रभात राजू कोळी याने 7 महिन्यात घरीच व्यायाम करून आपण अजूनही जलतरणास उत्साही असल्याचे दिसते. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे मुंबईहून निसर्गाच्या सान्निध्यात हवा बदल व ट्रेकिंग करण्यासाठी प्रभात हे आई वडिलांसह आले आहेत. सकाळ प्रतिनिधीने त्यांची भेट घेवून जलतरणबाबत त्यांची माहिती घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रभात कोळी या मराठमोठ्या युवकाने अगदी कमी वयात जलतरणामध्ये जगातील जवळपास सर्वच महासागरातील अवघड खाड्या (चॅनेल्स) पोहून स्पर्धेत यश मिळविले आहे. साहसी खेळांमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी दिला जाणारा भारतातील सर्वोत्तम तेसींग नोर्गे पुरस्कार त्याने मिळविला आहे. या ध्येय वेड्या तरूणाने जलतरणासाठी वयाच्या 8 व्या झोकून दिले. वडील राजू कोळी व आई शिल्पा यांच्या खंबीर पांठिब्यामुळेच तो यशस्वी झाल्याचे त्याने सांगितले.

वयाच्या बाराव्या वर्षी धरमतर ते गेट वे हा पल्ला त्याने पार केला. 2015 साली जर्सोबेट येथील 66 किलोमीटरचा पोहण्याचा पल्ला 10 तासात पूर्ण केला. असा पल्ला पूर्ण करणारा तो पहिला एशियन ठरला. इंग्लड, फ्रान्स मधील खाडीचे 34 किलोमीटर अंतर 13 तासात पूर्ण केला. २०१६ साली दुसरा इव्हेंट म्हणजे अमेरिकेतील ‘कॅटलीना चॅनल’ होय. येथील ३४ किमी अंतर १० तास ३० मिनिटांत पोहून पूर्ण केले. २०१७ साली तिसरा इव्हेंट म्हणजे हवाई येथील ‘क्वाई चॅनल’ होय. हे ४२ किमी ची शर्यत १७ तास २२ मिनिटांत पुर्ण करून ‘यंगेस्ट एशियन’ बनण्याचा विक्रम केला. २०१७ मध्ये ‘सुगुरू चॅनल’ हा ३० किमी चा शॅलो वॉटर इव्हेंट ९ तास २२ मिनिटांत पुर्ण केला. त्याचवर्षी ‘लेक कोंस्टंट’ मधील स्वित्झर्लंड ते जर्मनी हे ५ किमी अंतर ५ तास ११ मिनिटांत पुर्ण केले आणि अशी शर्यत पूर्ण करणारा पहिला एशियन बनला. याच वर्षी ‘मॅनहॅटन इव्हेंट’ सुध्दा पूर्ण केला. ‘ट्रिपल क्राऊन’ मिळविणारा तो पहिला एशियन होय.

२०१८ साली जगातील सर्वात खतरनाक ‘आयरिश चॅनल’ हा इव्हेंट म्हणजे ‘नॉर्थ आयर्लंड ते स्कॉटलंड’ हे ३२ किमी अंतर १० तास ४५ मिनिटांत पुर्ण केले. यासाठी सर्वात तरुण स्विमर म्हणून गिनीज बुक रेकॉर्ड सुध्दा केले आहे. साहसी खेळांसाठी दिला जाणारा ‘तेंसींग नोर्गे’ हा सर्वोत्तम पुरस्कार त्याला राष्ट्रपती यांच्या हस्ते दिला आहे. प्रभातला शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सुध्दा गौरविले आहे. मागील १२ वर्षांमध्ये १०० पेक्षा जास्त पदके त्याला मिळाली आहेत. ‘लाँग डिस्टन्स स्विमिंग’ मध्ये सहभाग घ्यायचा म्हणजे लाखो रुपये खर्च करायला लागतात. परदेशात जाण्यायेण्याचा खर्च, राहण्याचा खाण्याचा खर्च, रजिस्ट्रेशन फी, कोच फी, क्रू फी असा किमान १० लाख रुपये एका इव्हेंट साठी खर्च येतो. माझ्या प्रत्येक इव्हेंट ला माझे आईवडील माझ्या सावलीप्रमाणे माझ्या बरोबर राहिले आहे आणि मी जे काही करू शकलो ते फक्त या दोघांमुळे. माझ्या वडिलांनी माझ्या साहसी खेळासाठी स्वतःचे घर सुध्दा विकले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com