डिगे यांचे कार्य प्रेरणादायी - नाना पाटेकर

यशदा - शिवकुमार डिगे यांचा सत्कार करताना अभिनेते  नाना पाटेकर.
यशदा - शिवकुमार डिगे यांचा सत्कार करताना अभिनेते नाना पाटेकर.

पुणे - धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबविल्या. गरीब शेतकऱ्यांच्या मुलींसाठी गतवर्षी राज्यात तीन हजार सामुदायिक विवाह झाले. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. 

डिगे यांची मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक (निरीक्षण)पदी बदली झाली. यानिमित्त यशदा येथील सभागृहात आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. प्रभारी धर्मादाय आयुक्त आशुतोष करमरकर म्हणाले, की डिगे यांनी अल्पावधीत धर्मादाय कार्यालयाला समाजाभिमुख करण्याचे काम केले. 

पुण्याचे सहआयुक्त दिलीप देशमुख, औरंगाबादचे सहआयुक्त श्रीकांत भोसले, धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप, भरत व्यास यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहायक धर्मादाय आयुक्त साजीद रचभरे, राहुल चव्हाण, राणी मुक्कावार आदींनी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com