Nana Patole : नाशिकमध्ये सर्वपक्षीय हाय होल्टेज ड्रामा; नाना पटोले

खडकवासला येते महिला आघाडीच्या बैठकीसाठी नाना पटोले आले होते
Nana Patole
Nana Patole Esakal

पुणे : नाशिक पदविधर विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. त्यावर नाना पटोले यांनी बोलण्यास नकार दिला.

हा सर्वपक्षीय हाय होल्टेज ड्रामा होता. तांबे हे काही ओरडले तरी बोललेच पाहिजे असे नाही. त्यांच्यावर आमचे प्रवक्ते बोलतील, त्यांच्या बोलण्यातून समाधान झाले नाही, तर मी बोलतो माझ्याकडे भरपूर मसाला आहे, असे आव्हान नाना पटोले यांनी दिले.

सत्यजित तांबे यांनी पदविधर निवडणुक झाल्यानंतर माझी भूमिका मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज पत्रकरार परिषद घेऊन सर्व घटनाक्रम सांगत पटोले यांच्यावर आरोप केले.

खडकवासला येते महिला आघाडीच्या बैठकीसाठी नाना पटोले आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, ‘‘तांबे यांच्याबाबत प्रवक्ते बोलतील. योग्य वेळी योग्य उत्तर द्यावं लागतं. काही ओरडलं काही बोललं तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं गोदी मीडियाला सांगितला असेल तर मला माहिती नाही.

विखे पाटील यांच्या बद्दल मी काही दिवसानंतर पद्धतशीर बोलणार आहे. माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांची जागा विखे घेऊ पाहात आहेत. अजित पवार यांनी घरातील भांडण चव्हाट्यावर आणले आहेत. त्यांनी आमच्या पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्यावर टीका केली. ते महाविकास आघाडीत असूनही तांबे यांना मत मारली असे सांगत आहेत.

नाशिकमधील हा हाय होल्टेज ड्रामा सर्वपक्षीय आहे. त्यामुळे मला यावर काहीही बोलायचे नाही. काँग्रेस समोर महागाई, आदानी, एलआयसी बँका लुटल्या जात आहेत, लोकांच्या कामाचा पैसा लुटला जात आहे, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या हे प्रश्न अनेक महत्वाचे प्रश्‍न आहेत. ६ तारखेला आम्ही मोठे आंदोलन करणार आहोत, असे पटोले म्हणाले. दरम्यान, तांबे यांच्या आरोपांवर पत्रकारांनी वारंवार प्रश्‍न विचारल्याने त्यांनी माध्यमांवर आगपाखड केली.

वापरून फेकून देणे भाजपची नियत

गरज संपली की फेकून देणे ही भाजपची नियत आहे. मुक्ताताई आजारी असताना मतदानाला यायच्या, त्यांचे पती त्यांच्याबरोबर यायचे. एवढ्या निष्ठावंताला वेळेवर डावलले बरोबर नाही, अशी शब्दात कसब्यातून शैलेश टिळक यांना डावलल्याने पटोले यांनी टीका केली. तसेच

काँग्रेसने अजून कोणालाही उमेदवारी घोषित झालेली नाही. पक्षाच्या वतीने सर्वे करण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल हाय कमांडला पाठवलाय त्या आधारावर उद्या रात्रीपर्यंत निर्णय येईल, असेही पटोले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com