'नानासाहेब धर्माधिकारी हे दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व : शरद पवार

pawar
pawar

शिवणे : ''नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व होते. त्यांचे स्मरण अखंड होण्यासाठी त्यांनी दिलेले विचार व संस्कार वैयक्तिक जीवन जगताना आचरणात आणले पाहिजे. यातून आपण त्यांचे स्मरण सर्वांनी जपले पाहिजे.” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

कर्वेनगर ते शिवणे रस्त्याला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी पथ असे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी अकरा वाजता केले. यावेळी, शरद पवार यांना पद्मविभूषण व तीर्थरूप डॉ. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेतीन फुटांची प्रतिमा व मानचिन्ह देऊन सत्कार केला.
 
खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री सुनील तटकरे, यांच्यासह धर्माधिकारी परिवारातील 
उमेश, सचिन, राहुल, अर्चना, स्वराली श्रेयस हे आणि शारवीय देशपांडे, सचिन दोडके, कुमार गोसावी, सायली वांजळे, दीपाली धुमाळ, दत्ता धनकवडे, काका चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. 

सर्व सामान्य माणसांवर उत्तम संस्कार, विचार देण्याचे काम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी नानासाहेबांनी उभे आयुष्यभर कष्ट केले. म्हणून त्यांचे नाव या रस्त्याला दिले आहे. असे सांगून पवार म्हणाले, “माणसा-माणसामध्ये बंधुत्व प्रेम वाढत आहे. माणसाच्या या शक्तीचा उपयोग समाजातील अन्य घटकांच्या उभारणीसाठी केला. सामूहिक शक्तीच्या माध्यमातून देश बलशाली व बलदंड करण्याची गरज आहे. ही गरज नानासाहेब धर्माधिकारी यांनी मांडली. तो वारसा आप्पासाहेब व सचिन धर्माधिकारी जपत आहे. 

अप्पा धर्माधिकारी म्हणाले, चांगल्या विचारांची आज गरज आहे. विचाराने लगेच आयुष्य बदलत नाही. सातत्याने विचार व संस्काराची गरज असते. मन स्वच्छ असले पाहिजे तर सर्व स्वच्छ दिसेल. सध्या अनेकजण चंगळवादाकडे वळत आहे. त्यांना, मानवता धर्माची शिकवण ही संत साहित्याच्या माध्यमातून पोचविली पाहिजे. कोकणात अंधश्रद्धा जास्त आहे. अंधश्रध्देमुळे डोळे असून आपण आंधळे होतो. संशयामुळे माणूस भरकटतो. समर्थ बैठकीमुळे हे प्रमाण कमी आले आहे.”

सुळे म्हणाल्या, “श्री सदस्यांच्या शिस्तीची दाद देते. माझ्याकडे तुमच्या सारखी शिस्त नाही. मी बेशिस्त आहे. शिस्त शिकण्यासाठी निवडणुकीनंतर आठवडाभर रेवदंडा येथे राहून शिस्त शिकणार. समाजाला आध्यात्मची गरज आहे. धर्माधिकारी परिवार गेली  50- 60 वर्षे काम करीत आहे. त्याचा आनंद समाधान आहे. धर्माधिकारी परिवाराच्या कामाची माहिती पुस्तक सीडी नाही. माल चांगला खपवायला जाहिरात करायला लागत नाही. धर्माधिकारी यांनी जाहिरात केली नाही. माझे वडील शरद पवार यांनी देखील 50 वर्षात जाहिरात नाही. परंतु सध्याचे केंद्रातील सरकार 24 तास जाहिरात करते.
माझ्या मतदार संघात व्यसनमुक्तीचे काम करायचे असल्यास आम्ही पोलीस यंत्रनेला कळवावे लागत होतं. आता पुढे नानासाहेब धर्माधिकारी यांची व्यसनमुक्तीची यंत्रणा लावणार. 

तटकरे म्हणाले, “धर्माधिकारी यांचे विचारामुळे सर्व नागरिकांना आत्मिक बळ मिळाले. नवीपिढी घडविण्याचे काम हा परिवार करीत आहे.”

सचिन धर्माधिकारी म्हणाले,  “शिकवण घेतलेला प्रत्येकजण सुखी झाला आहे. वाईट बरोबर हे संस्कार, शिक्षणामुळे समजते. वाईट विचाराला कसे आवरायचं हे विवेकातून मिळाते. जीवन जगत असतानाच आपल्या चांगल्या कामातून मुक्ती मिळाली पाहिजे.” 
दोडके म्हणाले, “माझ्या भाग्याने हा कार्यक्रम मला मिळाला. असे मी समजतो. हे व्यासपीठ खूप मोठे आहे. येथे येऊन भाषण करण्याची  माझी योग्यता नाही. तुमच्याप्रमाणे आम्ही देखील सदगुरूचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत.”
बाबू दोडके, शुक्राचार्य वांजळे, हिंदकेसरी योगेश दोडके, आबा दोडके, सचीन गोटे, सोनाली दोडके, राणी दोडके, ऋतुजा दोडके, रेश्मा बराटे, पूजा हगवणे, शोभा पायगुडे, माया दोडके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com