शिवणे नांदेड पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूकीस बंद

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 31 जुलै 2019

- खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग 14 हजार क्यूसेक पर्यत वाढल्याने शिवने नांदेडचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली होती.
- उत्तमनगर व हवेली पोलिसांनी ही वाहतूक पर्यायीमार्गे वळविली होती. 
- शिवणे- नांदेड दरम्यानचा मुठा नदीवरील हा पूल कमी उंचीचा व अरुंद पूल आहे

शिवणे : खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग 14 हजार क्यूसेक पर्यत वाढल्याने शिवने नांदेडचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली होती. उत्तमनगर व हवेली पोलिसांनी ही वाहतूक पर्यायीमार्गे वळविली होती. 

शिवणे- नांदेड दरम्यानचा मुठा नदीवरील हा पूल कमी उंचीचा व अरुंद पूल आहे. साधारण सात हजार क्यूसेक पेक्षा जास्त पाणी सोडल्यास तो पूल पाण्याखाली जातो. दुचाकी-चारचाकीसाठी हा सोयीचा पूल आहे. दिवसभर या पुलावर मोठी वर्दळ असते. 

नांदेड गावातील अनेक मुले पाचवीच्या पुढील शिक्षणासाठी शिवणे येथील नवभारत विद्यालय येतात. आज मंगळवारी धरणातून सकाळी साडेसहा हजार,  आठ वाजता 9 हजार क्यूसेक पाणी सोडल्याने हवेली व उत्तमनगर पोलीसानी वाहतूक बंद केली. 
नांदेडहुन शिवणे, वारजे, कोथरूड हिंजवडीकडे जाणारे वाहनचालक हा पूल वापरतात. त्यांना सिंहगड रस्ता बाह्यवळण मार्गे वाहतुक वळविल्याचे हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले. शिवणे गावाकडून जाणारी वाहतूक प्रामुख्याने नांदेड धायरीकडे जाते. त्यामुळे ही वाहतूक उत्तमनगर, कोंढवे धावडे, मुठा नदीपूल खडकवासला मार्गे वाहतूक वळविली मागवली असे उत्तमनगरचे पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे यांनी सांगितले. 

धरणातून पाणी सोडल्यामुळे ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दोन्ही बाजूला पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता तरीदेखील वाहतूक कोंडी होत होती.

पूल अरुंद व कमी उंचीचा पूल असल्याने येथे अनेक जण वाहून गेले होते. तर दररोज अरुंद पूल असल्याने दोन वाहने एकावेळी पुलावर आल्यास वाहनांचे एक पुलावरून खाली जात होते म्हणून जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी लोखंडी संरक्षक कठडे 10 दिवसांपूर्वी लावले होते. आज धरणातून  सोडलेल्या पाण्यामुळे तुटून गेले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded bridge is closed due to Water submerged