आयएमडी कामगार समन्वय संघाच्या अध्यक्ष पदी नंदकुमार गोंडगे

राजकुमार थोरात
सोमवार, 30 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या अध्यक्षपदी नंदकुमार महादेव गोंडगे व सचिवपदी प्रवीण धाेंडिराम बल्लाळ यांची बिनविरोध निवड झाली.

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या अध्यक्षपदी नंदकुमार महादेव गोंडगे व सचिवपदी प्रवीण धाेंडिराम बल्लाळ यांची बिनविरोध निवड झाली.

वालचंदनगर येथे वालचंदनगर कंपनीमध्ये 1985 पासुन आयएमडी कामगार समन्वय संघ कार्यरत आहे. आयएमडी कामगार समन्वय संघाने आत्तापर्यंत वेतन वाढीचा 9 करार केले आहे. संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय बोराटे व सचिव शिवाजीराव खटकाळे सेवानिवृत्त झाल्याने अध्यक्षपदी गाेंडगे व सचिव पदी बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीनंतर गोंडगे यांनी सांगितले. संघटनेच्या माध्यमातुन कामागारांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आयएमडी कामगार समन्वय संघाची कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

 नंदकुमार महादेव गोंडगे (अध्यक्ष),सिध्दार्थ चितारे,विजय रायते,मुरलीधर चिंचकर (उपाध्यक्ष), प्रविण धाेंडिराम बल्लाळ (सचिव), प्रदिप जांबले, रफिक मणेरी,गाेरख जाधव (सहसचिव), प्रविण अंकुश साळुंके (खजिनदार), गणेश जगताप, जी.एम.पवार, अजित अर्जुन, संतोष सोनवणे (संघटक), शिवाजीराव खटकाळे (सल्लागार).

Web Title: nandkumar gondage selected as IMD employees union chief