नंदनवनचे कार्य दिव्यांग-मतिमंद बांधवांना प्रेरणादायी - कैलास घोडके

दत्ता म्हसकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : दिव्यांग मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या सुप्त कलागुणांना जोपासण्याचे काम  नंदनवन संस्था करते, असे गौरवोद्गार जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी व्यक्त केले. 

धामणखेल (ता. जुन्नर) येथील माय ऍक्टीव्हिटी सेन्टर संचलित नंदनवन (मतिमंद-दिव्यांग बांधवांसाठी) या संस्थेत मुंबईच्या आधार जनकल्याण सेवा संस्था व मळगंगा माता जेष्ठ नागरिक संघ, शिरोली खुर्दच्या वतीने सिलिंग फॅन व लंच टेबल अशा नित्योपयोगी वस्तूचे वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

अध्यक्षस्थानी शिरोली खुर्दचे जेष्ठ नागरिक शंकरराव मोरे होते. या प्रसंगी आधार जनकल्याण सेवा संस्थेचे प्रमुख माजी सैनिक व निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर दत्तात्रय सोमोशी यांची अखिल भारतीय ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती संस्था (रजि) नवी दिल्लीच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, माणसात देव शोधा, माणुसकी जपा, मनुष्य जन्म अनमोल आहे. दुःख व संकटाच्या वेळी आधार मिळाला तर जगण्याची उमेद वाढेल. दीन दुबळ्यांच्या सेवेतच खरं सुख आहे. 
यावेळी रुपाली बोकरिया, दीनानाथ जाधव, कोंडाजी मोरे, दगडू सोमोशी, अरुण मोरे, हरिभाऊ मोरे, भरत मोरे, मल्हारी मांडे, शंकरराव बारेकर, मुनीर इनामदार, किसन नायकोडी, बबन सोमोशी, दत्तात्रय सोमोशी, अतुल सोमोशी आदी जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक विकास घोगरे यांनी केले. सूत्रसंचालन एफ. बी. अतार यांनी केले. सुभाष मोहरे यांनी आभार मानले.

Web Title: nandwan work inspiring for handicapped said by kailas ghodke