आव्हानांवर नॅनोटेक्‍नॉलॉजीने मात शक्‍य - गर्ग

पुणे स्टेशन - ‘नॅनोकॉन’ परिषदेचे उद्‌घाटन सुधीर गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी (डावीकडून) डॉ. आनंद भालेराव, डॉ. पॉल रॉफ, गर्ग,  डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. जोसेफ ग्रीव्हज.
पुणे स्टेशन - ‘नॅनोकॉन’ परिषदेचे उद्‌घाटन सुधीर गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी (डावीकडून) डॉ. आनंद भालेराव, डॉ. पॉल रॉफ, गर्ग, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. जोसेफ ग्रीव्हज.

पुणे - देशासमोरील आव्हानांवर नॅनोटेक्‍नोलॉजीच्या साहाय्याने उत्तर शोधणे आवश्‍यक आहे. नॅनोटेक्‍नोलॉजीला आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह अन्य प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्यातून होणाऱ्या संशोधनाचा समाजाला व्यापक फायदा होऊ शकतो. म्हणूनच अशा संशोधकांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने संशोधन क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली आहे. त्यासाठी देशात तंत्रज्ञान केंद्र निर्माण केली जात असून, या केंद्रांसह स्टार्ट अपचे जाळेही विस्तारले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय लघू व मध्यम उद्योग विभागाचे सहसचिव सुधीर गर्ग यांनी दिली.

भारती अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय नॅनोकॉन परिषदेचे उद्‌घाटन गर्ग यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, अमेरिकेतील ड्रॅक्‍सेल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. पॉल रॉफ, अमेरिकेच्या जॉइंट स्कूल फॉर नॅनो सायन्स अँड नॅनो इंजिनिअरिंगचे अंतरिम अधिष्ठाता डॉ. जोसेफ ग्रीव्हज, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव उपस्थित होते. भारती विद्यापीठ आणि ड्रॅक्‍सेल विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करारावर या वेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नॅनोटेक्‍नोलॉजी आणि नॅनोसायन्स या क्षेत्रांत प्रगतीमुळे मोठे बदल होणार आहेत. 

नॅनोतंत्रज्ञानामुळे विविध प्रकारच्या नव्या उत्पादनांची निर्मिती शक्‍य आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. नॅनोतंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यावरणपूरक आणि सर्वसामान्य नागरिकांचे जगणे सुसह्य करणारी उत्पादने तयार होणे आवश्‍यक असल्याचे मत डॉ. रॉफ यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com