संसदीय कामकाजाची अधोगती - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पुणे - ‘लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती झाली आहे. लोकसभा, विधानसभेचा पूर्वीचा दर्जा आता राहिलेला नाही. हे बदलण्यासाठी एखाद्या विषयाला न्याय मिळवून देणारे, विचारांतून विकास घडविणारे परखड वक्ते तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत,’’ असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले. 

नऱ्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या वतीने राणे व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्या वेळी राणे बोलत होते. याप्रसंगी भारती विश्‍वविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, उद्योजक संजय घोडावत, सातारा येथील विश्‍वजित मोकाशी, ‘पुढारी’चे संपादक प्रतापसिंह जाधव यांनाही त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, शार्दूल जाधवर, आमदार भीमराव तापकीर, विद्याधर अनास्कर या वेळी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, ‘‘शिक्षणाचा प्रसार होत असताना त्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सामान्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोचले पाहिजे.’’

नोव्हेंबरपर्यंत पाहा आरक्षणाची वाट
मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत वाट पाहावी लागेल, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. पुण्यात नऱ्हे येथे एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी राणे आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, ‘‘आरक्षण देणाऱ्या समितीचा मी अध्यक्ष होतो. त्याचा अहवाल मी दिलेला आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यायचा आहे. तो आल्यानंतर सरकारने आरक्षणासंबंधी निर्णय घेतला नाही तर ते आरक्षणाबाबत काहीच करीत नाही, असे म्हणता येईल.’’

Web Title: Narayan Rane Talking