Kukadi Water : कुकडीच्या पाण्यावरून वाद चिघळणार; कुकडीचे पाणी पेटणार

जुन्नर तालुक्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी) कुकडीचा पाणीसाठा राखून ठेवल्याशिवाय कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडून दिले जाणार नाही.
Vadaj Dam Water
Vadaj Dam WaterSakal
Summary

जुन्नर तालुक्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी) कुकडीचा पाणीसाठा राखून ठेवल्याशिवाय कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडून दिले जाणार नाही.

नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी) कुकडीचा पाणीसाठा राखून ठेवल्याशिवाय कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडून दिले जाणार नाही. असा इशारा आमदार अतुल बेनके यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिला. तुम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने राजकारण बाजूला ठेवून माझ्या भूमिकेला दादा तुम्ही पाठिंबा द्या. अशी विनंती यावेळी आमदार बेनके यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली.

येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा तालुक्यासाठी उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यासाठी आज पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी आमदार अशोक पवार, अतुल बेनके, रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता संभाजी माने, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अशोक घोडके आदी उपस्थित होते.

बैठकित आमदार पवार, माजी मंत्री शिंदे यांनी कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी केली. या वेळी कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचिव संतोष सांगळे म्हणाले कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणाच्या मृतसाठ्यातून तीन टीएमसी, माणिकडोह धरणातून ०.४ टीएमसी, डिंभे धरणातून ०.५ टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडावे लागेल.

त्यानंतर येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्यात येईल. आमदार बेनके म्हणाले सध्या पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन १० मे पर्यत सुरू राहणार आहे. कुकडी प्रकल्पात आज अखेर ६.६ टीएमसी (२२.४४ टक्के) नीचांकी पाणीसाठा शिल्लक आहे.

माणिकडोह धरणात १ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जुन्नर शहर व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. पिंपळगाव जोगे धरणाची पाणी पातळी कमी झाली आहे. आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. येडगाव धरण जलाशयात नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. यामुळे जुन्नर तालुक्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी कुकडीचा पाणीसाठा राखून ठेवल्या शिवाय कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन कोणत्याही परिस्थितीत सोडून दिले जाणार नाही.

वेळप्रसंगी कुकडीच्या हक्काची पाण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन केले जाईल. आमदार बेनके यांच्या भूमिकेमुळे कुकडीच्या पाण्यावरून पुढील काळात वाद चिघळणार व कुकडीचे पाणी पेटणार असल्याचे स्पष्ट झाले. तालुक्यातील मीना, कुकडी व इतर नद्यांवर असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यासाठी कुकडीतील पाणीसाठ्याचे नियोजन करण्याची मागणी या वेळी आमदार बेनके यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

● कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात आज अखेर शिल्लक उपयुक्त पाणी साठा : येडगाव: ०.९१६ टीएमसी (४७ टक्के), माणिकडोह: १.०९टीएमसी (१०.७७ टक्के), वडज:०.२२३ टीएमसी (१९.०६ टक्के), पिंपळगाव जोगे : १.२ टीएमसी (३१.६६ टक्के), डिंभा : ३.२ टीएमसी (२५.६७ टक्के).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com