द्राक्ष खरेदीकडे निर्यातदारांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नारायणगाव - अतिशय मेहनतीने लाखो रुपयांचा भांडवली खर्च करून विषमुक्त (रेसिड्यू फ्री) निर्यातक्षम जंबो द्राक्षाचे उत्पादन घेण्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादकांनी यश मिळविले. अवेळी पाऊस व प्रतिकूल हवामानाच्या समस्येमुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात काढणीच्या अवस्थेतील परिपक्व मण्यांना क्रॅकिंग झाले आहे. त्यामुळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवली आहे. 

निर्यातक्षम द्राक्षाची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत करावी लागल्याने जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यांतील द्राक्ष उत्पादकांना गेल्या दोन महिन्यांत सुमारे दोनशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यांत द्राक्ष पिकाखाली सुमारे सहा हजार एकर क्षेत्र आहे. गेल्या पाच वर्षांत पांढऱ्या जातीच्या थॉमसन सीडलेस, सोनाका, तास ए गणेश, शरद सीडलेस, फ्लेम या जातीच्या द्राक्षाचे क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांनी जंबो द्राक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मागील वर्षी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान निर्यातक्षम जंबो द्राक्षाला प्रतिकिलो १२० रुपये ते दीडशे रुपयांचा; तर फेब्रुवारी ते मार्चदरम्यान शंभर रुपयांचा भाव मिळाला होता.

Web Title: narayangaon news grapes purchasing export