टोमॅटो उत्पादक दुहेरी संकटात

रवींद्र पाटे
सोमवार, 2 जुलै 2018

नारायणगाव - घसरलेला बाजारभाव व बुरशीजन्य रोगामुळे टोमॅटो फळाला देठाजवळ चिरा (क्रॅकिंग) पडत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या दुहेरी संकटामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील उत्पादक सध्या हैराण आहेत. 

नारायणगाव - घसरलेला बाजारभाव व बुरशीजन्य रोगामुळे टोमॅटो फळाला देठाजवळ चिरा (क्रॅकिंग) पडत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या दुहेरी संकटामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील उत्पादक सध्या हैराण आहेत. 

जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी उन्हाळी व पावसाळी हंगामासाठी दोन टप्प्यांत या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली होती. यापैकी बाजारभावाच्या अभावामुळे पहिल्या टप्प्यातील उन्हाळी हंगाम तोट्यात गेला. पावसाळी टोमॅटोचा तोडणी हंगाम जून महिन्यात सुरू झाला. एक जूनपासून टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली. सुरवातीचे पंधरा दिवस येथील उपबाजारात टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) दोनशे ते साडेतीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मात्र, त्यानंतर घट होऊन क्रेटला शंभर रुपये ते पान २ वर 

महिन्यात २७ कोटींची उलाढाल
नारायणगाव उपबाजाराचे कार्यालयीन प्रमुख शरद घोंगडे म्हणाले, ‘‘या वर्षी जून महिन्यात उपबाजारात १५ लाख ३४ हजार २४५ टोमॅटो क्रेटची आवक झाली. टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते साडेतीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. खरेदी-विक्रीतून उपबाजारात एक महिन्यात २६ कोटी ७५ लाख ७५० रुपयांची उलाढाल झाली. मागील वर्षी उपबाजारात जून महिन्यात ११ लाख १६ हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. टोमॅटो क्रेटला दोनशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. खरेदी विक्रीतून उपबाजारात ३० कोटी २२ लाख रुपयांची उलाढाल झाली होती. 

Web Title: Narayangaon news Tomato farmer trouble