Narayangav Theft : माजी पंचायत समिती सदस्याच्या घरी दिवसा चोरी; तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला

बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे साडे एकोणचाळीस तोळे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
Theft
TheftSakal
Summary

बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे साडे एकोणचाळीस तोळे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

नारायणगाव - येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या श्री गजानन अपार्टमेंट मधील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे साडे एकोणचाळीस तोळे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना रविवारी (ता. १४) दुपारी झाली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

नारायणगाव ग्रामपंचायतिचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर व जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्या अर्चना आशिष माळवदकर यांचा येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या जीवन हॉटेलच्या बाजूला ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट हा तीन मजली बंगला आहे. या पैकी तिसऱ्या मजल्यावर आशिष माळवदकर हे राहतात. तर इतर दोन मजल्यावर त्यांचे बंधू राहतात. नारायणगाव येथील मूथा मार्केटमध्ये अर्चना माळवदकर यांचे साड्या विक्रीचे दुकान आहे. रोज सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत माळवदकर दाम्पत्य हे फ्लॅट बंद करून दुकानात जातात.

नेहमी प्रमाणे रविवारी सकाळी साडेदहा वाजता आशिष व त्यांच्या पत्नी अर्चना या घराला व बेडरूमला कुलूप लावून नारायणगाव येथील कापड दुकानात गेले. सायंकाळी आठ वाजता घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे व बेडरूचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील दोन कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. आशिष माळवदकर यांनी या बाबतची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार सनील धनवे घटनास्थळी आले.

आज सकाळी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांचे ठसे मिळाले आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. अशी माहिती ताटे यांनी दिली. दरम्यान रविवारी दुपारी वारूळवाडी हद्दीतील सवेरा सोसायटी मधील तीन बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरी झाली आहे. मात्र सदर फ्लॅट मधील कुटुंबिय बाहेरगावी असल्याने चोरी गेलेल्या मुद्देमालाची माहिती मिळाली नाही.

नकली दागिने घरातच: चोरट्यांनी माळवदकर यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे साडे एकोणचाळीस तोळे दागिने चोरून नेले. मात्र कपाटात असलेले सोन्याचे व चांदीचे नकली दागिने बेडरूममधिल गादीवर काढून ठेवले. सोन्याचे व चांदीचे नकली व खरे दागिने याचे चोरटे पारखी असल्याचे व चोरटे सराईत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com