...म्हणूनच शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला

Narendra-Dabholkar
Narendra-Dabholkar

पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.  

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी पुनाळेकर यांच्या जामिनावर सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पुनाळेकर यांनी वकिली क्षेत्राची रेषा ओलांडून एक साधक म्हणून दुसऱ्या साधकाला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा कर्नाटक विशेष तपास पथकाने (एसआयटी) नोंदविलेल्या जबाबात, पूर्ण शस्त्र नष्ट न करता त्याचे काही सुटे भाग करून ठाणे येथील खाडीत फेकून द्यावे, असा सल्ला पुनाळेकर यांनी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उर्वरित शस्त्राचे भाग दुसऱ्या गुन्ह्यात वापरायचे होते का, असा प्रश्न ॲड. सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. 

‘सनातन’ संस्थेवर २००६ मध्ये बंदी आल्यानंतर त्यांनी हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून काम सुरू केले. डॉ. दाभोलकर यांना ‘तुमचा दुसरा गांधी करू’, असेही धमकावण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी निदर्शनास आणून दिले. पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com