...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - ‘केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता टिकली नाही, तर बॅंकेचा गव्हर्नर एखाद्या राज्याच्या राज्यपालाप्रमाणे नामधारी होईल,’ असे प्रतिपादन खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. 

दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्‍लब, लायन्स इनोव्हेशन फोरम व आकुर्डी येथील सूर्या ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ‘भारतीय अर्थव्यवस्था ः आजची व उद्याची’ या विषयावर ते बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाले.

या वेळी अक्षरधाम स्वामिनारायण मंदिर ट्रस्टचे स्वामी ज्ञानवत्सल, लायन्स क्‍लबचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल अभय शास्त्री, व्याख्यानमालेचे संयोजक प्रकाश नारके, शरद पवार, राजेंद्र गोयल आदी उपस्थित होते. 

सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून आगामी अंतरिम अंदाजपत्रकात एखाद्या मोठ्या योजनेची घोषणा होऊ शकते.
- डॉ. नरेंद्र जाधव

Web Title: Narendra jadhav Talking