नरखेड येथे चोरी ; 2 तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरीला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

बंद घराच्या खिडकीच्या ग्रीलचा गज उचकटून आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील दोन तोळे सोने व रोख रक्कम असा 65 हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नरखेड (ता. मोहोळ) येथे सोमवारी मध्यरात्री घडली 

मोहोळ : बंद घराच्या खिडकीच्या ग्रीलचा गज उचकटून आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील दोन तोळे सोने व रोख रक्कम असा 65 हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नरखेड (ता. मोहोळ) येथे सोमवारी मध्यरात्री घडली 

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरखेड येथील सावकार नरवडे व कुटुंबीय उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीच्या ग्रीलचा गज उचकटून आत प्रवेश केला व बेडरुममधील लोखंडी कपाट कटावणीने तोडून आतील एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम पंधरा हजार असा हजाराचा माल चोरून नेला. याबाबत सावकार धर्माण्णा नरवडे 52 यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, तपास पोलिस नाईक लक्ष्मण राठोड करीत आहेत.

Web Title: Narkhed Village Robbery 65 Thousands

टॅग्स