नासाच्या स्पर्धेत पुण्याची मोहोर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या नासा एम्स स्पेस सेटलमेंट स्पर्धेत पुण्यातील द ऑर्किड स्कूल आणि विद्या व्हॅली स्कूल या दोन शाळांनी बाजी मारली आहे. या स्पर्धेत मोठ्या गटात ऑर्किड स्कूलने पहिल्या क्रमांकावर आपली मोहोर उमटविली. विद्या व्हॅली स्कूलने छोट्या गटात दुसरा क्रमांक पटकाविला.

दरवर्षी नासातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) निर्माण कसे करायचे आणि त्यात काय असेल, ते कसे काम करेल, या संदर्भातील आखणी विद्यार्थ्यांना करायची होती. जगभरातील जवळपास अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ऑर्किड स्कूलमधील सातवी आणि नववीच्या अकरा विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी लुनार ऑर्बिट स्टेशन-तारा (एलओएस-तारा) या नावे अवकाश स्थानकाचा दीडशे पानांचा संशोधन प्रकल्प तयार केला आणि त्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. 

शाळेच्या युनिट हेड नेत्रे कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांनी अवकाश स्थानक निर्माण करण्याचा प्रकल्प स्वत:च केला. अवकाश स्थानकाबद्दल शास्त्रीय माहिती, त्याची रचना, कार्यप्रणाली जाणून घेत विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली होती. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प नासाला सादर केला.’’

स्पेस स्टेशनवर विद्यार्थ्यांनी केले संशोधन
अंतराळात संशोधन केंद्र कसे उभारायचे, ते अवकाश स्थानक कुठे असले पाहिजे, त्याची रचना कशी असावी आणि त्या स्थानकात संशोधक राहणार असतील तर त्याची कॉलनी कुठे असेल, यावर आधारित संशोधन प्रकल्प या विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. 

Web Title: nasa aims apce settlement competition