नाशिकमध्ये गोदावरीला पूर; 1 मुलगा वाहून गेल्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

गरज पडल्यास महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नागरिकांना हलविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

नाशिक : गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरण व आळंदी धरणाच्या खालील भागामध्ये (फ्री कॅचमेट एरिया) पाऊस आणि गटारीच्या पाण्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. पुरात 1 मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाऊस  वाढत असल्याने व तेथून प्रवाहित होणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा गोदावरी नदीस येऊन मिळत असल्याने गोदावरी नदीकाठचा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, लाऊडस्पीकरव्दारे नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला जात आहे. गरज पडल्यास महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नागरिकांना हलविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरम्यान, पंचवटीत गोदावरीत मोरे मळा भागातील मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे सोमेश्वर धबधबा खळाळून वाहू लागला असून धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. नांदूर माध्यमेश्वर धरणातून 50 हजार क्यूसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: nashik news rains godavari river flood