नाशिक रस्त्याचे काम बंद पाडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नारायणगाव - येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाणार आहे. कामाची वर्क ऑर्डर दाखवा, तोपर्यंत काम थांबविण्याची विनंती ग्रामस्थांनी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने शनिवारी रात्री काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी मध्यरात्री जाऊन रुंदीकरणाचे काम बंद केले. या वेळी ग्रामस्थ व ठेकेदार यांच्यात बाचाबाची झाली.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून वारूळवाडी व नारायणगाव शहरातून जाणाऱ्या येथील जुन्या महामार्गाच्या ५.३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल २२ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. डांबरीकरण झालेल्या काही भागात रस्ता उखडल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती रात्रीच्या वेळी हे काम केले जात असल्याने नारायणगाव व वारूळवाडी ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी या बाबतची तक्रार खासदार आढळराव पाटील यांच्याकडे केली होती. शुक्रवारी आढळराव पाटील यांनी ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून काम चांगले करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्या नंतरही कामात सुधारणा झाली नाही. ठेकेदाराने शनिवारी रात्री मुरमाऐवजी मातीचा भराव टाकून डांबरीकरणाचे काम सुरू केले होते. रात्री बाराच्या सुमारास, उद्योजक संजय वारुळे, वरुण भुजबळ, माजी उपसरपंच परशुराम वारुळे, रोहिदास केदारी, मुकेश वाजगे, विजय घेगडे, सूरज वाजगे, सतेज भुजबळ आदींनी जाऊन काम बंद केले. या वेळी ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली.

महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, त्या दर्जाचे काम केले जात नाही. कामाबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारी अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन काम बंद करण्यास ठेकेदाराला सांगितले आहे. 
- अमित बेनके, युवा नेते

Web Title: Nashik Road Work Close