बारामती - विद्या प्रतिष्ठानच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पुरस्कार

मिलिंद संगई
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

बारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट सूक्ष्मजीवशास्त्र विभाग म्हणून पुरस्कार जाहिर झाला आहे. 

मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने दरवर्षी सूक्ष्मजीवशास्त्र विभागात उत्तम कार्य करणा-या महाविद्यालयांना सन्मानित केले जाते. सन 2017-2018 या आर्थिक वर्षासाठी विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास हा बहुमान प्राप्त झाला. प्राचार्य डॉ. भरत शिंदे व विभागप्रमुख नीलीमा पेंढारकर यांनी ही माहिती दिली. 

सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचा संशोधनामधील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षणपूरक उपक्रम, समाजाभिमुख भूमिका, सामंजस्य करार तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध यश या निकषांवर महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातून विविध नामांकीत महाविद्यालयांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले होते. यात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास हा पुरस्कार मिळाला. महाविद्यालयाने या विभागात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हे यश प्राप्त झाले. 

संस्थेचे उपाध्यक्ष अँड. अशोक प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त अजित पवार, सुनेत्रा पवार, अँड. नीलीमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्रीकांत सिकची यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. भरत शिंदे व नीलीमा पेंढारकर यांचे अभिनंदन केले आहे. 
 
Web Title: National award for Vidya Pratishthan's microbiology department