महिला लेखापालांची राष्ट्रीय परिषद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

"दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय)' आणि "कमिटी फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्‍टिस' यांच्यातर्फे महिला लेखापालांसाठी दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.

पुणे : "दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय)' आणि "कमिटी फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्‍टिस' यांच्यातर्फे महिला लेखापालांसाठी दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.

1 व 2 सप्टेंबर सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत बाणेर रस्त्यावरील यशदा प्रशिक्षण केंद्रामध्ये ही परिषद होणार आहे, अशी माहिती आयसीएआयच्या उपाध्यक्षा ऋता चितळे व रेखा धामणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सीए व्यवसायाची नीतिमूल्ये, व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग व दुरुपयोग, विकसित होणारा सीए व्यवसाय अशा विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. परिषेदत संशोधन प्रबंधांचे सादरीकरण करण्यात येईल. तसेच "जोखीम व्यवस्थापन' या विषयावर गुरुनंदन सानवल बोलणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करण्याऱ्या महिलांच्या चर्चासत्राचे आयोजन व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या महिलांचे सत्कारदेखील करण्यात येतील.

Web Title: National Council of Women Accountants