राष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी

प्रशांत चवरे
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

भिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला कृतीशीलतेची जोड दिल्याशिवाय अशा शिक्षणाचा व्यवहारांमध्ये उपयोग होणार नाही. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा आहे त्याचा युवकांनी व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोग करुन घ्यावा असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. भगवान माळी  यांनी केले.

येथील कला महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त युवकांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान या विषयावरील आयोजित व्याख्यानांमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य भास्कर गटकुळ होते तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेंद्र शिरसट, डॉ. प्रज्ञा लामतुरे, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. बाळासाहेब खरात, सकाळ यीन प्रतिनिधी आमिर शेख, प्रा. निलेश जाधव, प्रा. उज्वला खानावरे उपस्थित होते. डॉ. माळी पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीमत्वे प्रदान केली आहेत व स्वच्छ भारत अभियानांमध्ये मोठे योगदान दिले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भास्कर गटकुळ म्हणाले, एकविसाव्या शतकामध्ये विविध क्षेत्रामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या युगांमध्ये टिकायचे असेल तर सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्वाची गरज असते. महाविदयालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांमुळे विदयार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासांमध्ये महत्वपुर्ण भुमिका निभावते त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातुन पाहण्याची आवश्यकता आहे. प्रास्ताविक प्रा. सुरेंद्र शिरसट यांनी केले सुत्रसंचालन प्रा. पद्ममाकर गाडेकर यांनी केले तर आभार प्रा. शाम सातर्ले यांनी मानले.

Web Title: national service scheme is workshop to create innovative youth said dr mali