राष्ट्रभक्तीपर गीत स्पर्धेत पुणे प्रथम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे - राष्ट्रीय देशभक्तीपर गीतांची समूहगान स्पर्धा हैदराबाद येथे नुकतीच झाली. यात पुण्यातील मयूर कॉलनीमधील बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेने संस्कृत आणि लोकगीतांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला, तर हिंदीत या संघाला तिसरा क्रमांक मिळाला. पंजाबमधील अमृतसरच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.

भारत विकास परिषदेतर्फे संपूर्ण देशांमधील शाखांमध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्तीपर गीतांची समूहगान स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा हिंदी, संस्कृत आणि लोकगीत (प्रादेशिक भाषा) अशा तिन्ही भाषांमधील गीतांसाठी स्वतंत्रपणे घेण्यात आली. 

कार्यक्रमाचे उद्‌घाटन हैदराबादच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलिस अधिकारी अभिलाषा बिश्‍त यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तेलंगणा सरकारचे मुख्य सचिव रामण्णाचारी, तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. शिवशंकर राव, समूहगान स्पर्धेचे चेअरमन द. बा. चितळे, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशचंद्र गुप्ता आणि राष्ट्रीय सचिव अजय दत्ता उपस्थित होते. विजेत्या संघांना केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. 

या स्पर्धेत संपूर्ण देशातून सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धांचे परीक्षण नि:पक्षपाती होण्यासाठी जाणकार संगीततज्ज्ञ उपस्थित होते. त्यामध्ये पुण्याचे पंडित हरिश्‍चंद्र गवारे यांनी परीक्षक म्हणून काम केले.

Web Title: National Song Pune